Fashion Show - वात्सल्य ट्रस्ट, मुंबई - कुर्ला

07 Dec 2022 17:45:42

 

 Fashion Show - वात्सल्य ट्रस्ट, मुंबई - कुर्ला
 
 
वात्सल्य ट्रस्ट, मुंबई ही मुंबईतील अनाथ / परित्यक्त बालकांच्या पुनर्वसनाचे काम करणारी कांजुरमार्ग स्थित एक नामांकित संस्था आहे. या कार्यासोबतच सध्या कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत फार मोठ्या कक्षेत कार्यरत आहे. दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी संस्थेमार्फत कुर्ला येथे भगिनी मंडळाच्या इमारतीत ‘उडान’ हा उपक्रम सुरु झाला. या उपक्रमांतर्गत सौंदर्य प्रसाधन / मेहेंदी, संगणक प्रशिक्षण, शिवणकाम / फँशन, मोबाइल दुरुस्ती, GDA यांसारखे प्रशिक्षण वर्ग चालतात.
 

दि. ३.१२.२०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत कुर्ला प्रकल्पात Fashion Designing Center च्या विद्यमाने Fashion Show आयोजित केला गेला. यामध्ये शिकणा-या मुलींनी अत्यंत कमी वेळात कल्पकतेने शिवलेले Fashionable कपडे स्वत: परिधान करून मोठ्या दिमाखात हा show सादर केला. या कार्यक्रमाला वात्सल्य ट्रस्ट, मुंबई संस्थेचे कार्यवाह श्री. श्रीकांत जोशी, ज्येष्ठ विश्वस्त श्री. ना.सि. सराफ, कार्याध्यक्ष श्री. गिरीश कुलकर्णी, Tailoring & Beauty Training प्रकल्पाच्या प्रमुख श्रीमती रंजना नरवणे यांच्या सह स्थानिक नगरसेवक - श्री. अश्रफ आजमी, प्रसिद्ध समाजसेवक - श्री. व सौ. हेमंत सामंत, नामांकित फॅशन डिझायनर - भारती कोकणे, पोलीस निरीक्षक – श्री. मारुती पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळच्या संचालिका – श्रीमती सुवर्णा सोनावणे, कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती प्रतीक्षा कांबळे, अॅक्ट फाउंडेशनचे प्रमुख – श्री. सौरभ शिंदे व झारापकर इन्स्टिट्यूटचे प्रमुख – श्री. प्रफुल्ल घोलप आशा प्रतिष्ठीत व्यक्तींनी वर्णी लावली होती. श्रीमती अरुणा अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले.

 

माननीय श्री. अश्रफ आजमी यांनी फार मोजक्या पण भावपूर्ण शब्दात मुलींच्या शिक्षणाचे महत्व आपल्या मनोगतात व्यक्त केले. श्री. हेमंत सामंत व भारती कोकणे यांनीही आपले विचार अत्यंत समर्पकरित्या मांडले व मुलींच्या कौशल्याचे कौतुक केले. एकूण २० विद्यार्थिनींनी या show मध्ये सहभाग घेतला होता. या मुलींनी जीवाचे रान करून अत्यंत कमी वेळात हे कपडे शिवले व ते आकर्षकरित्या सादर केले त्याचे खरच करावं तेवढ कौतुक कमीच. श्रीमती रूख्सार खान यांनी या प्रशिक्षणार्थींना खूप मेहेनतीने तयार केल. या मुलींचे कसब पाहून सर्व उपस्थितांचे डोळे दिपले इतका अभिमानास्पद आणि नयनरम्य सोहळा सादर झाला.

 

जास्तीत जास्त गरजू मुलींनी कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत निरनिराळ्या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेऊन आपल्या पायावर उभे राहावे व आत्मनिर्भर व्हावे असा संदेश या कार्यक्रमाद्वारे वात्सल्य परिवार देऊ इच्छितो. ज्या मुली आयुष्यात उंच भरारी मारू इच्छितात त्यांच्यासाठी एक अत्यंत सुरक्षित व अभिमानस्पद मंच वात्सल्य ट्रस्ट, मुंबई देऊ करतय. तेव्हा पुढे व्हा. आत्मनिर्भर बना.

 
 
VTM
 
VTM
 
 
 

VTM

VTM
 
 

VTM
 
VTM
 
 
VTM
 
 
VTM
Powered By Sangraha 9.0